पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत उप पोलीस स्टेशन रेपन पल्ली येथे भव्य आरोग्य मेळावा संपन्न



संजय मानकर तालुका प्रतिनिधी कुरखेडा



मा. पोलीस अधिक्षक गडचिरोली श्री. *निलोत्पल सो,* मा. अपर पोलीस अधिक्षक अभियान श्री. *अनुज तारे सो* , मा.अपर पोलीस अधिक्षक प्रशासन श्री *.कुमार चिंता सो,* मा. अपर पोलीस अधिक्षक (प्राणहिता) श्री. *यतिश देशमुख सो.,* यांचे संकल्पनेतून व *मा. उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा श्री. सुजितकुमार क्षीरसागर* सो. यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 21/02/2023 रोजी उपपोस्टे रेपनपल्ली येथे पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत भव्य आरोग्य मेळाव्याचे व *नेत्र चिकित्सा शिबिराचे तसेच रक्तदाब, शुगर ची तपासणी चे आयोजन करण्यात आले होते.*
              सदर आरोग्य मेळाव्यास अध्यक्ष म्हणून वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथिल नेत्र चिकित्सक डॉ. राहुल इंगोले, प्रमुख अतिथी प्राथमिक आरोग्य उप केंद्र रेपनपल्ली येथील डॉ. नेहा तसेच रेपनपल्ली पोलीस पाटील कमलाबाई सडमेक तसेच ताटीगुडम पोलीस पाटील सीताराम मडावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच उपपोस्टे हद्दीतील नागरिक उपस्थित होते.
           मेळाव्याची सुरुवात *क्रांतिसूर्य बिरसा मुंडा* यांचे प्रतिमेचे पूजन करून व मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.
                मेळाव्यास उपस्थित मान्यवरांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी कशी घेता येईल, रोगराई दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, तसेच वेळीच उपचार घेणे आवश्यक असल्याचे समजावून सांगितले व आपआपल्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनाविषयी मार्गदर्शन केले. *प्रभारी अधिकारी गोविंद खटिंग* यांनी प्रास्ताविक करून पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची व ऑपरेशन रोशनी संदर्भाने माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.
         
   सदर आरोग्य मेळाव्यामध्ये पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील नागरीकांना खलील प्रमाणे लाभ देण्यात आला.
         1) *98 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली.* 
त्यापैकी *31 लोकांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले.* सदर लोकांची लवकरच *ओपरेशन रोशनी* अंतर्गत शस्त्रक्रिया करण्याची तजवीज ठेवली आहे.
           2) *60 लोकांची बी.पी. तपासणी करण्यात आली.* 
          3) *61 लोकांची शुगर तपासणी करण्यात आली.* 
         4) *40 लोकांना डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप देण्यात आले* 
         तसेच उपपोस्टे रेपनपल्ली येथील जिल्हा पोलिस अधिकारी तसेच अमंलदार आणि CRPF B9 यांच्या संयुक्त विद्यमाने हद्दीतील *150 नागरिकांना मच्छरदानी वाटप करण्यात आले.* 
        
            सदर आरोग्य मेळाव्यास 180 ते 200 नागरिक उपस्थित होते. सर्व उपस्थितांसाठी अल्प- उपहार व चाय ची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांचे आभार प्रर्दशन *पोउपनि मनोहर साहेब* आणि यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस *पोउपनि जाधव सा.* यांनी केले.
            
 **उपपोस्टे* 
 *रेपनपल्ली टिम..* 🙏🏻

Post a Comment

Previous Post Next Post