वनजमिनीच्या अवैध विक्रीप्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित


गडचिरोली:  मध्यवर्ती परिसरात असलेल्या कोट्यवधीच्या वनजमिनीवर लेआऊट तयार करून भूखंड विक्री केल्याच्या प्रकरणात भूमाफियांवर कारवाई करताना हयगय केल्यामुळे गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांना निलंबित करण्यात आले आहे. सदर प्रकरण माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

गडचिरोलीच्या आयटीआय ते गोकुळनगर बायपास मार्गावर असलेल्या सर्वे क्रमांक २१ मधील १.२९ हेक्टर वनजमिनीवर भूमाफियांना अतिक्रमण केले होते. काही दिवसांनी त्यावर प्लॉट पाडण्यात आले व काही भूखंडाची विक्री देखील केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी आरोपींवर गुन्हे दाखल करून थातुरमातूर कारवाई केली. मात्र, पुढील कारवाई करताना ८ ते १० महिने चालढकल केली. या दरम्यान भूमाफियांनी अनेकांना भूखंडाची विक्री केली. माध्यमांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर वनविभागाला जाग आली व त्यांनी ती जमीन अतिक्रमण मुक्त करून ताब्यात घेतली गेली

Post a Comment

Previous Post Next Post