संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा



अंबड ता. ५ : दैनिक प्रहार चे प्रतिनिधी नितिन चव्हाण यांच्या घरावर शनिवारी रात्री झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांना निवेदन देऊन संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा प्रकारची मागणी उपस्थित पत्रकारांनी केली. यावर सदर घटने संदर्भात श्री. बगाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पत्रकारांनी समाधान व्यक्त केले.


निवेदन देते प्रसंगी नितिन चव्हाण, कुमार कडलक, देवानंद बैरागी, दिलीप राज सोनार, दिलीप कोठावदे, राजेंद्र शेळके, नरेंद्र दंडगव्हाळ, अजय पाटील, विकास बाविस्कर, प्रमोद दंडगव्हाळ, खुशाल पाटील, दामोदर थोरात, सचिन दिवटे, किरण आहेर, हेमंत काळमेख, राजेंद्र सूर्यवंशी, भगवान थोरात, चंद्रकांत धात्रक, मानस जोशी, मायकल खरात, हिरालाल लोथे आदीसह शहर व सिडकोतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post