ग्रामपंचायत निवडणुकीत पैसा घेतेस ना भाऊ... मग तुला घरकुल कसा देणार


गडचिरोली :- सुरुवातीच्या काळात माणसाच्या सीमित अश्या मूलभूत गरजा होत्या. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा जीवन जगण्यासाठी आवश्यक मानल्या जायच्या. मात्र दिवसेंदिवस मानवांच्या गरजा वाढत चालल्या आहेत. तीन गरजां व्यतिरिक्त आणखी दोन गरजा म्हणजे शिक्षण व आरोग्य या सुद्धा मूलभूत गरजा जीवनाआवश्यक झालेल्या आहेत. आजची स्थिती बघता वेगळाच प्रकार पाहावयास मिळतो.ज्या गरजू व्यक्तींना घरकुलाची आवश्यकता आहे. अशा व्यक्तींना घरकुल तर सोडा, साधी नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही. अशी अनेक कुटुंबे आपले संपूर्ण जीवन उघड्यावरच जगत आहेत.

निराधार, अपंग,मोलमजुरी करणारे, गोरगरीब व इतर सर्वसामान्य नागरिक घरकुलाचे लाभ मिळेल या आशेवरच आहेत. परंतु यांस कुठलेही लाभ मिळत नाही. मोळकडीस आलेल्या घरातून केवळ पाल बांधून आपले दारिद्र्यातील जीवन अनेकजण आयुष्य काढीत आहेत. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. केवळ नामधारी पाहणी करून पोकळ आश्वासने राजकीय गावातील नेते, पदाधिकारी व कर्मचारी देतांना दिसून येत आहेत. पोकळ आश्वासन देऊन भोळ्याभाबड्या जनतेची.   दिशाभूल करू नये.अन्यथा जनता आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post