पोलिसांच्या बातम्या लावतो म्हणून न्यूज़ पोर्टल च्या संपादकांवर दबाव…पोलिसांकडून कार्रवाई च्या धमक्या ? -तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशनचा प्रकार -पत्रकाराणे केली पोलिस अधीक्षक, मुख्यमंत्री,गृहमंत्री कड़े तक्रार -आता सोशल मीडियाला कमी लेखु नका..तेच फास्ट बातम्या देतात त्यांचा सन्मान करा .


तुमसर/भंडारा – तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी बातमी संकलना करिता आलेल्या एका न्यूज़ पोर्टल च्या संपादकाचा अपमान केल्याची तक्रार पोलिस अधीक्षक,मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना केली.
अधिकारी ,कर्मचारी,पोलिस डियूटी करतात की नाही या बातम्यावर त्यांची प्राथमिकता असते…पोलिस विरुद्ध बातम्या का लावता म्हणून त्यांच्यावर पोलिसांचा मोठा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या विरुध्द खोट्या नोंद करून त्यांची पत्रकारिता कमजोर करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.


जिल्ह्यतच नाही राज्यात,राज्यात नाही देशात,देशात नाही जगात सोशल मीडिया ने कमाल केली आहे.स्ट्रीम मिडियाने आपली विश्वासहर्ता काही प्रमाणात गमावली दिसते. प्रिंट असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो मुख्य समस्यावर लक्ष देत नसल्याने व सत्ता पक्षाची बाजू मांडत असल्याने आता जनता मीडिया पासून त्रस्त आहे.मात्र सोशल मीडिया वर कमालिचा विश्वास आहे.मग यूट्यूब असो की फेसबुक,ट्वीटर, इंस्टाग्राम सोशल मीडिया ने देशात नव्हे जगात क्रांति केली.अनेक आन्दोलन सोशल मीडिया ने मोठे केले.
सीएम पासून ते पीएम पर्यंत सर्वच सोशल मीडिया चा उपयोग घेत आहे.डिजिटल इंडिया करण्याचे खुद्द पीएम मोदी यांचे स्वप्न आहे.

काही लोकांचा तर उपजीवीकेचे साधन सुद्धा आहे.काही मात्र सोशल मिडियाचा दुरुपयोग सुद्धा घेत आहे.म्हणूनच सूचना प्रसारण मंत्रालयाने फेब्रुवरी 2021 ला कायदे करण्याचे ठरविले आहे. काही दिवसात ते लवकर लागू होतील.
सोशल मिडियाच्या पत्रकाराची शासना दरबारी नोंद नसली तर त्यांची वेबसाइट ही गूगल ने मान्य केली आहे.व शासनाच्या उद्धम आधार वर नोंदणी सुद्धा आहे.मग अधिकारी का म्हणता की नोंद नाही.जिल्हा माहिती अधिकारी यांनी आता प्रत्येक जिल्ह्यातील सोशल मीडिया ची यादि तयार करून त्यांना नियमाच्या दायऱ्यात आनावे व मान्यता द्यावी अशी मागणी राज्य माहिती संचालक जयश्री जोग मॅडम यांना नागपुर डिजिटल न्यूज़ पोर्टल संघाचे अध्यक्ष भीमराव लोणारे,सचिव विजय खवसे यांनी अधिवेशन काळात नागपुरच्या विधानभवनात भेट घेवून केली.यावर नागपुरच्या जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी पोर्टल च्या संपादकांची बैठक घेवून नावे नोंद केले आहे.राज्यात न्यूज़ पोर्टल चांगले काम करीत आहे.तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत कुठलाही भेदभाव करु नये,सन्मान पूर्वक वागणूक देण्याची मागणी होत आहे.

सविस्तर वृत असे आहे की तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सनी कुकडे यांनी ‘पोलीस की आवाज ‘चे मुख्य संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख राजेश नारायण उके, नाकाडोंगरी हे नेहमीच समस्या च्या बातम्या करीत असतात, अधिकारी ,कर्मचारी,पोलिस डियूटी करतात की नाही या बातम्यावर त्यांची प्राथमिकता असते…पोलिस विरुद्ध बातम्या का लावता म्हणून राजेश ऊके वर पोलिसांचा मोठा दबाव असल्याचे उके यांनी सांगितले.त्यांच्या विरुध्द खोटी नोंद करून त्यांची पत्रकारिता कमजोर करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

राजेश ऊके हे दिनांक १० जानेवारी २०२३ ला गोबरवाही पोलीस ठाण्यात बातमी संकलन करीता गेले असता रवी जाईभाई यांच्यासोबत भेटले. त्यांनी पत्रकारास चहा पिण्यासाठी आग्रह केला. त्यामुळे ते त्या ठिकाणी ते थांबले .परंतु तेथील स्टेशन डायरीवर उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी सनी कुकडे यांनी पत्रकार राजेश उके यांच्यासोबत अभद्र व्यवहार करून सदर पत्रकारास ब्लॅकमेलर म्हणून अपमान केला. त्यामुळे दोघांत थोडीफार शाब्दीक संवादही झाला.

त्यानंतर ते घरी निघून गेले. अशा पद्धतिचा अपमान पोलीस सनी कुकडे यांनी केला व अपमानास्पद वागणूक सदर पत्रकारासोबत केली .यासंबंधीची लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी भंडारा ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ,यांच्याकडे लेखी पत्रकाद्वारे केली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे .व पोलीस सनी कुकडे यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे .


सदर पत्रकारासोबत अपमानास्पद वागणूक केलेल्या पोलीस शिपाई कुकडे यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे निषेध करण्यात येत असून सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात येऊन पोलीस शिपायावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा
या संदर्भात आंधलगाव पोलिस स्टेशन चे एपीआई या प्रकारणाचे चौकशी अधिकारी राजकुमार सर यांना फोन वर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की ऊके हे पत्रकार नाही तसी माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कडून घेतली.राजेश उके यांच्या वर 5 ते 6 वेगळया वेगळ्या तक्रारी आहे.त्याचे रिकॉर्ड खराब आहे असे सांगण्यात आले

यावर राजेश ऊके यांनी सांगितले की माझ्या विरुध्द जनतेची आज पर्यंत एकही तक्रार नाही.माझी बदनामी करीत आहे.कारण मि पोलिसांच्या विरुध्द बातम्या करतो म्हणून…आता हा वाद मुख्यमंत्री,गृहमंत्री पर्यंत पोहचला आहे.पुढे क़ाय कार्रवाई होईल या कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post