प्रेमाला विरोध, प्रेमी युगलाने केले विष प्राशन

 
 
अकोला - कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध असल्याने प्रेमी युगलाने विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला तर प्रेयसीची प्रकृती गंभीर आहे. 


अकोला जिल्ह्यातील सांगली खुर्द येथील 23 वर्षीय अतुल वायधने या युवकाचे बाळापूर तालुक्यातील एका मुलींसोबत प्रेम संबंध होते, एकदिवस दोघांना मुलीच्या काकांनी बघितले असता, अतुल व त्याच्या प्रेयसीला मारहाण करण्यात आली. Love story
कुटुंबाच्या दबावानंतर मुलीने अतुल विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली होती, 31 डिसेंबर 2022 ला अतुल आपल्या प्रेयसीला सोबत घेत पुण्याला पळून गेला. Akola crime
त्या प्रकरणी पोलिसांनी अतुल वर गुन्हा दाखल केला होता, 16 फेब्रुवारीला अतुल मावशी कडे आला, उरळ पोलिसांनी दोघांना 19 फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
परंतु पोलीस ठाण्यात हजर होण्याआधी दोघांनी विषारी औषध प्राशन केले आणि उरळ ला पोहचले. Maharashtra crime
प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ते दोघे कोसळले असता पोलिसांनी दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान अतुल चा मृत्यू झाला तर प्रेयसी मृत्यूशी झुंज देत आहे.
मुलीने लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये मुलीचे कुटुंब व पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे.

नववधुची बलात्कार करून हत्या- अवश्य वाचा

घरच्यांच्या दबावामुळे मी अतुलचा पोलिसांत खोटा रिपोर्ट दिला. माझं अतुलवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार होतो. एक दिवस आम्ही दोघे बोलत असताना काकांना दिसलो आणि काकांना मला आणि अतुललाही मारहाण केली. जेव्हापासून आमचं प्रेम घरच्यांना माहिती पडलं तेव्हापासून त्यांच्याकडून आम्हाला प्रचंड त्रास झाला. नेहमी सतत टोमणे, माझे बाबा काठीने माझ्या पायावर मारायचे. जेवण सुद्धा द्यायचे नाही. शाळाही बंद केली. शेतात पाठवायचे. शाळेसाठी लागणाऱ्या लेटर वह्यांसाठी घरच्यांना पैशाची मागणी केली पण त्यांना वाटायचं की मी अतुलसाठी पैसे मागते. त्रास असह्य होत होता. मला घरी हे सारं भोगाव लागत होता. यासाठी अतुलला म्हटलं मला येथून घेऊन जा, अन्यथा मी जीव देईन. तेव्हा ते मला 31 डिसेंबर 2022 ला पुण्याला घेऊन गेले. त्यानंतर पोलीस अतुलच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास देत होते. अतुलच्या मोठ्या भावाला पोलीस म्हणायचे तू त्या दोघांना घेऊन ये नाहीतर तुलाच आत टाकू, अशा धमकी द्यायचे. आता आम्ही दोघेही या गोष्टींना कंटाळलो आहे, त्यामुळे त्यामुळे माझं जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार उरळ पोलीस राहतील. बस आता आमच्या दोघांना जगू द्या, आमचं लग्न लावून द्या एवढीच माझी इच्छा आहे.

काय म्हणतात उरळ पोलीस?

युवकाने मुलीला पळवून नेल्याप्रकरणात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान मृतावर कोणताही दबाव पोलिसांनी आणला नाही. पोलिसांनी कारवाईदरम्यान कोणालाही धाकदपट सुद्धा केली नाही. पोलीस कायद्यानुसार कारवाई करत आहेत.






Post a Comment

Previous Post Next Post