दोन जहाल नक्षलवाद्यांना झाली अटक


गडचिरोली : - २००६ पासून फरार असलेल्या दोन जहाल नक्षलवाध्यांस गडचिरोली पोलिस दलाने गोपनियरित्या अभियान राबवून हैद्राबाद येथून २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी अटक केली आहे. त्यामध्ये पुरुष नक्षली नामे- टुगे ऊर्फ मधुकर चिनन्ना कोडापे वय ४२ वर्षे याचा समावेश असून तो उपपोस्टे मरपल्ली अंतर्गत येत असलेल्या मौजा- बस्वापूर, तह. अहेरी, जि. गडचिरोली येथील रहीवासी आहे. त्याच्यावर ९ खुन,८ चकमक,२ दरोडा, ४ जाळपोळ, १ खुनाचा प्रयत्न व १ इतर असे एकुण २५ गुन्हे दाखल आहेत.

अटक करण्यात आलेली महिला नक्षली नामे- शामला ऊर्फ जामनी मंगलु पुनम वय ३५ वर्षे ही बंडागुडम, बासागुडा, जि. - बिजापूर (छत्तीसगड) येथील रहीवासी असून ती अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तीचेवर आजपावेतो १ खुन, ५ चकमक, १ जाळपोळ, १ दरोडा व १ इतर असे एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post