तहसीलदाराने मुरुम उत्खनाचा परवाना दिला तरी कसा?


गोरेगाव,  दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२३ : झांजिया येथे सरकार च्या नावाने जमीन गट नं. १८७ इथुन मुरुम उत्खनन साठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू असताना अरुण बिसेन ( सरपंच ग्रा. प. झांजिया ) यांनी आक्षेप घेतला. तसा ग्रा. पं. झांजिया चा पत्र तहसीलदार यांना पाठविला पण तहसीलदार यांनी ते पत्र स्विकृत केले नाही. झांजिया येथे सरकार च्या नावाने जमीन गट नं. १८७ इथुन मुरुम नेण्यासाठी वनविभागाच्या हद्दीतून टिप्पर न्यावे लागत असतांना सुद्धा तहसीलदाराने आपल्या मुरुम उत्खनना च्या परवान्यामध्ये वनविभागाची नाहरकत ची आवश्यकता नाही असे नमूद केले. दि. ०३ फेब्रुवारी रोजी उत्खनन कार्य व वनविभागाच्या हद्दीतून मुरुम ने भरलेले टिप्पर अवैध वाहतूक होत अश्ल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्ष्यात आल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून एम. एच. 35 ए. जे. 0883 नंबर चे टिप्पर जप्त केले आहे. त्या मुळे तहसीलदारांची कार्यपद्दत चुकीची अश्ल्याचे लक्ष्यात येते.

Post a Comment

Previous Post Next Post