आरमोरीतील इंग्रजकालीन जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा झाली शंभर वर्षांची , आरमोरी येथे शताब्दी मोहोत्सवाचे आयोजन




आरमोरी.....' रम्य ते बालपण ,अस बालकविनी म्हटले आहे .बालपण हे खेळायचे असते, बागळायचे असते. त्या रम्य असलेल्या बालपणासह आनंदीदायी शिक्षणाचे पाठ ज्या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी गिरविले. ज्या शाळेच्या भिंतीवर शाळेच्या पहिल्या दिवसापासून बाराखडी आणि बेरीज वजाबाकीचे धडे गिरविले. ज्याची साक्ष अजूनही त्या भिंती देत आहेत. माणूस घडविणारी ती गरीब विद्यार्थ्याची शाळा म्हणुन ओळखली जाणारी आणि हजारो विद्यार्थी घडविणारी इंग्रजकालीन आरमोरी येथील जिल्हा परीषद केंद्र शाळा शंभर वर्षांची होत आहे. अनेक घटनेचा साक्षीदार असलेली ही शाळा बालपणातील अनेक गोष्टींना उजाळा देत असुन शंभर वर्षापूर्वी स्थापन झालेल्या शाळारुपी लहानशा रोपाचे रूपांतर आज विशाल वटवृक्षात झाले असुन तिच्या छायेखाली आजही शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.




देशाला स्वतंत्र मिळायचे होते. इंग्रज राजवटीखाली देश होता. त्याच इंग्रजाच्या राजवटीत आरमोरी येथे सन १९२३ ला जिल्हा परीषद केंद्र शाळेची स्थापना करण्याचा आली. या शाळेत अनेक विद्यार्थी घडले. या शाळेच्या शिक्षकाकडून मिळालेल्या संस्काराची शिदोरी घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत आपले नाव लौकीक करित आहेतः अनेक विद्यार्थी उच्छ पदावर आहेत. शाळेचे वय जसे वाढले तसे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या त्या काळातील विद्यार्थ्याचे वय सुध्दा वाढले आहेत या शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी आजही अनेक विद्यार्थी वृद्धापकाळात आहेतः. असेही असले तरी माझी शाळा आज शंभर वर्षांची झाली असा अभिमानाचा भाव आजही अनेक माजी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर झळकत असून त्या सुंदर बालपणात अनेक विद्यार्थी डोकावत आहेत.


गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदची पुरातन व वैभवशाली संस्कृती लाभलेली शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा आरमोरी . जिल्ह्याची निर्मिती होण्याआधीच इंग्रजाच्या काळात सण १९२३ मध्ये या शाळेची स्थापना झाली. या वर्षी शाळेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या उपलब्धी वर शाळेचा शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी तसेच आरमोरी ग्रामवासीय यांच्या पुढाकाराणे शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ७, ८, व ९ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात येत आहे.


      या शाळेचा इतिहास पाहू जाता पहिले मुख्यध्यापक मारोतराव कोतकोंडावार गुरुजी पासून आजपर्यंत अनेक आदर्शवान शिक्षकांची परंपरा या शाळेला लाभलेली आहे. स्थापनेपासून आरमोरी व परिसरातील जवळ जवळ १४ ते १५ हजार विद्यार्थ्यांनी आपले इयत्ता पहली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत पूर्ण केले आहे . शाळेत शिक्षण घेणारे कित्येक विद्यार्थी हे राजकीय, व्यापारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी,उद्योजक, व इतर अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवित आहेत. या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात येत आहे. तरी या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शताब्दीमहोत्सवी सोहळ्यात उपस्थिती दर्शवावी असे आव्हाहन शिक्षक प्रतिनिधी राजेंद्र देवराव धात्रक , मुख्याध्यापिका सौं. वैशाली दीपक धाईत , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तेजराव निपाने उपाध्यक्ष सौं. सोनाली नारनवरे, बबन बेहरे, धनराज कांबळे, खुशाल वरवाडे, गुरूदास मेश्राम, सौं. ललिता ओद, सौं. वैशाली खेडकर, सौं. भारती चिकराम, मिलिंद खोब्रागडे, नीलकंठ सेलोकर, तथा मोठया संख्येने पालक वर्गकडून केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post