पांदण रस्त्याने रात्रभर होतो ट्रॅक्टर द्वारे वाळूची तस्करी तस्करीमुळे पांदण रस्त्याची लागली वाट

.......
आरमोरी महसूल प्रशासन मात्र गाढ झोपेत......


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 
दखल नूज भारत ७८२२०८२२१६



 आरमोरी तालुक्यातील करपडा चक शेती शिवरा लगत असलेल्या नदीपात्रातून रोज रात्रीला वाळूचा उपसा केला जात आहे आणि ही वाळू ट्रॅक्टर द्वारे करपडा लोहाराकडे येत असलेल्या पांदण रस्त्याने ट्रॅक्टर द्वारे आणली जाते यामुळे पांदण रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे पावसाच्या दिवसात पांदण रस्ता खराब झाल्यामुळे याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होणार आहे मात्र वाळू तस्करी रात्री दिवसा सुरू असून याकडे आरमोरी महसुल प्रशासन मात्र काना डोळा करत असल्याचे दिसून येत आहे नदीपात्र हा तलाठी साजा शिरशी मध्ये येत असून करपळा गावच्या मागच्या बाजूने असलेल्या पांदन रस्त्याने ही वाळू तस्करी केल्या जाते यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल कर बुडीत असून या वाळू तस्करीवर आरमोरी महसूल प्रशासन ताबडतोब अंकुश लावावा आणि शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याची लागलेली वाट थांबवावी असे परिसरातील शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी आरमोरी तालुक्यातील करपडा चक येथील वाळू तस्करीवर अंकुश लावावा असे सुद्धा परिसरतील जनतेकडून आणि शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post