कार व दुचाकीच्या धडकेत दोन जखमी



धानोरा:- 

लेखा गोडलवाही रस्त्यावर लेखा तलाव जवळील वळणावर आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. लक्ष्मण रानु पोटावी (६२) व दामा पदा दोन्ही रा. गोडलवाही अशी जखमींची नांवे आहेत.

प्राप्त माहितीनुसार धानोऱ्यावरून ते स्वगावी गोडलवाही येथे जात असतानाच गोडलवाहीकडून

येणाऱ्या एमएच ४९-०६०५ या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने लक्ष्मण पोटावी याच्या उजव्या पायाला जोरदार मार लागल्याने त्याचा पाय मोडला तर दामा पोटावी

जखमी झाला. जखमींना धानोरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले. अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post