*NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत आकाश विद्यालयाचे सुयश*



आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मोहझरी ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील भारत सरकार तर्फे घेण्यात आलेल्या NMMS (राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना) परीक्षेत सन 2022-23 मध्ये १४ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेनी यशाची परंपरा कायम राखली आहे. मागील वर्षी सन २०२१-२२ मध्ये १० पैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सदर शिष्यवृत्तीस पात्र झाले. आतापर्यंत या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ शाळेतील ३८ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सदर शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांला चार वर्षात म्हणजेच वर्ग ९ ते १२ वी पर्यत ६०,०००/- (साठ हजार रू) शिष्यवृत्ती शासन देत असते.शाळेतील सहा.शिक्षक श्री.एच. पी. पारधी हे या परीक्षेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेतर्फे व संस्थेतर्फे अभिनंदन !

Post a Comment

Previous Post Next Post