चार मुलांच्या आईचे 17 वर्षीय मुलासोबत ‘ इलू इलू ‘ मात्र शेवट असा की ..


देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून चार मुलांची आई असलेल्या एका महिलेचा 17 वर्षीय मुलावर जीव जडला आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली मात्र मुलाच्या घरच्यांकडून या प्रकरणाला विरोध सुरू झाला. महिला सतत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याकारणाने अखेर त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शांतीपुरम कॉलनी येथील रहिवासी असलेला असलेले मोहम्मद उस्मान वारसी यांच्या सतरा वर्षीय मुलाचा शिंपी कामाचा व्यवसाय होता. शोएब असे त्याचे नाव असून शेजारी राहणाऱ्या एका तीस वर्षीय महिलेसोबत त्याचे प्रेम संबंध होते. तिचे सासर निगोही शहर असे असून तिला चार मुले आहेत. त्यांच्यात प्रेम संबंध सुरू झाल्यानंतर घरच्यांकडून मुलाच्या भवितव्यासाठी तिच्यापासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला मात्र तिने त्यानंतर त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरू केले.

मोहम्मद उस्मान वारसे यांनी माहिती देताना सदर महिलेने आमच्या कुटुंबीयांना धमकी दिली होती की जर तुम्ही त्याचे लग्न माझ्यासोबत लावून दिले नाही तर मी त्याला खोट्या प्रकरणात अडकवेल. तिच्या दबावाला कंटाळून अखेर आमच्या मुलाने 22 फेब्रुवारी रोजी कुणालाही न सांगता शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले. सदर प्रकार मुलाच्या नातेवाईकांना समजतात त्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. सदर महिलेच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post