दारूच्या नशेत टाकीवरून गेला तोल, सुरक्षारक्षक ठार





एटापल्ली येथील घटना : निलंबनाची कारवाई

 एटापल्ली : दारूच्या नशेतील निलंबित सुरक्षारक्षकाचा पाण्याच्या टाकीवरून तोल गेल्याने कोसळून मृत्यू झाला. ही घटना २ मार्च रोजी सकाळी ९ वाजता शहरापासून जवळच असलेल्या तुमरगुंडा येथे घडली.

संतोष कम्मा कालंगा (३८, रा. तुमरगुंडा) असे मयताचे नाव आहे. तो सूरजागड येथील लोहखनिज प्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा. मात्र, त्यास महिनाभरापूर्वी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून निलंबित केले होते. तेव्हापासून तो दारू पिऊन फिरत असे.

१२ मार्च रोजी तो दारूच्या नशेत अहेरी उपविभागांतर्गत बांधलेल्या

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या टाकीवर चढला. यावेळी तोल गेल्याने त्याचा खाली कोसळून मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

संतोष कालंगा याला नोकरीवरून काढल्याने तो आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यामुळे तो तणावात जीवन जगत होता. दारू पिण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. टाकीवर चढला तेव्हाही तो मोठ्याप्रमाणात दारू पिऊन होता.


Post a Comment

Previous Post Next Post