बंदूकधाऱ्यांचा राजुऱ्यातील पेट्रोलपंपावर दरोड्याचा प्रयत्न





कर्मचाऱ्यांच्या समयसूचकता आली कामी

 राजुरा बामणी रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या जवळील एचपी कंपनीच्या कोतपल्लीवार पेट्रोलपंपावर दोन अज्ञात बंदूकधारी इसम आले. कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत पेट्रोलपंपाच्या कार्यालयाचे शटर बंद करून आतून कुलूप लावले. त्यामुळे काही वेळानंतर ते बंदूकधारी तेथून • पसार झाले. ही घटना गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

यासंदर्भात, पेट्रोलपंप व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून राजुरा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे दोन अज्ञात इसम पेट्रोलपंपावर

संशयास्पद स्थितीत फिरत होते. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे बारकाईने बघितले असता त्यांच्याजवळ बंदूक होती. लगेच कर्मचाऱ्यांनी पंपाच्या कार्यालयात जाऊन शटर आतून बंद केले. कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकांना ही माहिती दिली. त्यांनी लगेच राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. राजुरा पोलिसांनी दोन अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३३९३, ५०६, ३४ व भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ नुसार गुन्हा नोंदविला आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही हे इसम काही ठिकाणी संशयास्पद फिरताना पोलिसाना आढळून आले. पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी तपास करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post