लाईनमॅन दिनानिमित्त लाईनमॅन गोपाल संभाजी पुरकाम यांचे स्वागत


मोहझरी, शिवनी (खुर्द) : 4 मार्च 2023 हा दिवस 'लाईनमॅन दिवस' म्हणून ओळखला जातो. या दिवसाचे औचित्य साधुन आरमोरी तालुक्यातील शिवनी खुर्द येथे
मोहझरी, शिवनी (खुर्द) येथील कार्यरत असलेले लाईन मॅन गोपाल संभाजी पूरकाम यांचे आज लुंबिनी बुद्ध विहार येथे माजी पोलीस पाटिल श्री. पंढरीजी टेंभुर्णे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.



यावेळी शिवनी खुर्द येथील आनंदराव सांगोडकर, शंकर मेश्राम, रोहन अंबादे तसेच इतर गावकरी उपस्थित होते.

यावेळी लाईनमन गोपाल पुरकाम यांनी आवाहन केले की 'वेळेवर वीजबिल भरा आणि महावितरण कंपनीला सहकार्य करा' असे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post