गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तीन लाखाची लाच मागणी एका पोलीस हवालदाराला चांगलेच महागात पडलं अन् झाली अटक


बीड (दि. 10 मार्च) : - गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तीन लाखाची लाच मागणी एका पोलीस हवालदाराला चांगलेच महागात पडलं आहे. लाच मागितल्या प्रकरणी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदाराने 23 नोव्हेंबर 2022 रोजी लाचेची मागणी केली होती.

सादिक सिद्दीकी (वय-42 ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याबाबत 22 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या मामावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्याकरीता व तपासात मदत करण्याकरीता पोलीस हवालदार सादिक सिद्दीकी याने तीन लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता सादिक सिद्दीकी या गुन्ह्यात मदत आणि जामीन मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी सादिक सिद्दीकी याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस उप अधीक्षक दिलीप साबळे, पोलीस अंमलदार भीमराज जीवडे, पाठक, शिंदे, बागुल यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post