जुनी वडसा येथील प्रथमेश ईश्वर पत्रे घरातीलच बेडरुममधे गळफास घेऊन केली आत्महत्या


देसाईगंज :- नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जुनी वडसा येथील प्रथमेश ईश्वर पत्रे वय १५ वर्षे युवकाने आज ४ मार्च रोजी दुपारी ११.०० वाजेच्या सुमारास घरातीलच बेडरुममधे गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रथमेश पत्रे १० व्या वर्गात शिक्षण घेत असून घरी कुणीही नव्हते. आई- वडील बाहेर कामासाठी गेले होते व लहान बहीण ८ व्या वर्गात शिक्षण घेत असून शाळेतून घरी पोहचल्या नंतर प्रथमेश पत्रे हा घरातीलच बेडरुममधे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याने बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली. लगेच गावातील माजी नगरसेवक सचिन खरकाटे यांनी देसाईगंज पोलीस विभागाला सदर घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे कळते. गळफास घेण्याचे कारण अद्यापही कळलेले नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस विभाग करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post