युवा जादूगार चेतनकुमारांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा



धुळे: भारत हा असा देश आहे जिथे अनेक जाती धर्माचे लोक राहतात, मात्र आपल्या या देशात सर्व शहरी भाग आता शैक्षणिक बाबतीत पुरेपुर विकसित झाला आहे. मात्र ग्रामीण भागात आदीवासी परिसरात शिक्षणाची गंगा काही दिसत नाही. अनेक दिवसांपासून जादूगार चेतनकुमार अश्या भागाचे निरीक्षण करत रहातात. आदिवासी समाजातील व खेड्यातील विध्यार्थ्यांच्या शिक्षणाला वाव मिळावा याकरिता ते दर साला बादप्रमाणे ते दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही अनैतिक खर्च न करता विविध सामाजिक उपक्रम आयोजित करत असतात. यादरम्यान चेतनकुमार हे खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेत असतात. अनेक सामाजिक संस्थांना
भेटी देऊन आपल्या संपर्कातील असलेल्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मित्रांच्या सहाय्याने मदत मिळवून देत असतात तर कधी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक निरागस बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवित असतात. या वेळेस ग्रामीण आदीवासी भाग हा कसा सुशिक्षित होईल यासाठी जादूगार चेतनकुमार यांनी स्वतः वाढदिवसानिमित्त जुन्नर गावातील आदीवासी भागात जाऊन लहान मुलं मुलींना बालभारती बालमित्र पुस्तकाचे व बिस्कीट चे वाटप विविध खेळ,जादूचे प्रयोग करून दाखवले बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. हे सर्व करून त्यांनी एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे त्यांचे सर्वत्र परिसरात कौतुक होत आहे. आपण प्रत्येकाने जर आपला वाढदिवस हा अशा वेगळ्या पद्धतीने साजरी केला तर येणार प्रत्येक आदीवासी भाग हा सुशिक्षित व होईल आणि या मुळे सर्व आदिवासी समाजातील मुलं मुली हे एका चांगल्या पदा वर असतील, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन उपाध्याय, राकेश हल्लोर व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

Previous Post Next Post