मोटारसायकलच्या धडकेत युवक ठार





 गोंदिया: रावणवाडी रस्त्याने पायी जात असलेल्या युवकाला मोटारसायकलने जबर धडक मारल्याने युवक ठार झाला असून मोटारसायकल चालक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. येथील बसस्थानक मार्गावर शुक्रवारी (दि. १०) सकाळी ही घटना घडली. •लिलेश्वर लांजेवार (४५, रा. चारगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

चारगाव निवासी लिलेश्वर नेहमीप्रमाणे आपली सलून दुकान उघडण्यासाठी चारगावहून सायकलने रावणवाडी येथे आला व सायकल ठेऊन पायी बसस्थानककडे जात होता.

एवढ्यातच ग्राम मुरपार निवासी गिलेश दिनेश दमाहे (१६) याने ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एमएच ३१- सीवाय २६७० ने लिलेश्वरला जबर धडक दिली. या धडकेत लिलेश्वर जखमी होऊन ठार झाला. तर गिलेश दमाहे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोंदियातील खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आली आहे. माहिती मिळताच ठाणेदार भूजबल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. रावणवाडी पोलिसांनी प्रकरण नोंद करून तपास सुरू केला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post