१ लाख १० हजार ६७० रुपये एवढा पगार तरी घेतली लाच

एसीबीचा धमाका, सलग तीन दिवस 'ट्रॅप'


संभाजी नगर: एसीबीच्या अधिकायांनी कारवाईचा घमाकाच उडवून दिला आहे. सलग तीन दिवस सापळे यशस्वी केले. वाळूज एमआयडीसीतील सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी सिडकोतील दोन पोलिस कर्मचारी, जिल्हा परिषदेतील वेतन अधीक्षकाच्यानंतर तलाठी, कोतवाल आणि खासगी व्यक्तीला लाच घेताना रंगेहात पकडले.

अधीक्षकाकडे सापडले कोट्यवधींचे घबाड

• जि. प. च्या प्रा. शिक्षण विभागाच्या वेतन अधीक्षकाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या घरझडतीत सापडली. आरोपी दिलीप जऊळकर यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिली. निरीक्षक हनुमंत वारे, अनिता इटुबोने यांच्या पथकाने आरोपीची घरझडती घेतली.

त्यामध्ये १ कोटी २० लाख रुपयांचे सिडको एन-४ मध्ये घर, १५ तोळे सोने, ८३० ग्रॅम चांदी, ४५ हजार रुपये रोख रक्कम सापडली. तसेच जऊळकर याचे विविध बँकांतील लॉकर शुक्रवारी उघडले जाणार आहेत. त्यातही मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली, जऊळकर यास १ लाख १० हजार ६७० रुपये एवढा पगार आहे. तरीही त्याने लाचखोरी केल्याचे समोर आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post