आरमोरी येथील स्नेहल सेलिब्रेशन लॉनवर कारवाई करा


पंचवटीनगरातील नागरिकांची पत्रपरिषदेत मागणी

आरमोरी:  1 येथील पंचवटीनगरातील महाराणा चौकातील स्नेहल सेलिब्रेशन लॉनच्या ध्वनी प्रदुषणामुळे परिसरातील नागरिकांना डोके दुखणे, कानाचा त्रासासह आरोग्याच्या समस्या वाढत असल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे माणसांचा आवाज एकमेकांना स्नेहल सेलिब्रेशन लॉनच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी गडचिरोली यांच्या नेतृत्वात पंचवटीनगरातील नागरिकांनी पत्रपरिषदेत केली.


पत्रपरिषदेला वंचित बहुजन महिला आघाडीच्या संघटिका प्रज्ञा निमगडे, डॉ. कल्याणी उंदीरवाडे, विकास भैसारे, पंचवटीनगरातील विवेक उंदीरवाडे, दीपक गणवीर, कपिल प्रधान, अंकुश खेवले, गणू शेडमाके, रविशंकर बुल्ले, राजेंद्र गेडाम, चेतन निमगडे, राहुल खरवडे, वनिता उंदिरवाडे, सरीता बुल्ले, जयश्री रामटेके उपस्थित होते. पत्रपरिषदेला संबोधतांना प्रज्ञा निमगडे म्हणाल्या की, स्नेहल लॉनमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतल्या जातात. कार्यक्रमाच्या वेळेस रात्रीचे बारा वाजतापर्यंत मोठमोठ्या आवाजात डीजे वाजविल्या जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घराच्या भिती, दरवाजे, खिडक्या व घरातील इतर वस्तू व्हायब्रेट होऊन पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नवजात बालके, लहान मुले व उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांनी तसेच वयोवृद्धांची डीजेच्या आवाजामुळे झोपमोड होत आहे. डीजेचा आवाज इतका भयंकर असतो की, कुटूंबातील



जात नाही. डीजेच्या आवाजाचा विपरीत परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर झालेला. आहे. लॉनमधील कॅटर्सवाले उरलेले जेवन व खरकटे अन्न याच परिसरात जवळपास फेकत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांच्या आवाजामुळे विद्यार्थाच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. परीक्षा कालावधीत लॉनमधील ध्वनीप्रदुषणाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. तसेच कार्यक्रम सुरू असताना सदर परिसरात वाहनाची गर्दी असते. तसेच फटाक्यांची आतषबाजी खुल्या जागेत करीत असल्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासंबंधाने लॉनच्या मालकाशी परिसरातील नागरिकांनी संपर्क केले असता तेच अरेरावीची भाषा बोलतात.

स्नेहल सेलिब्रेशन लॉनच्या डीजेच्या ध्वनीप्रदुषणावर आळा घालण्याबाबत याअगोदर नागरिकांनी तहसिल कार्यालय, नगरपरिषद व पोलीस स्टेशनला तक्रार दिली. परंतु, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला दिला आहे.


परिसरातील नागरिक डीजेचा आवाज, दुर्गंधी व वाहनांच्या गर्दीने त्रस्त असल्याने लॉनच्या मालकावर प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी अन्यथा प्रशासकीय यंत्रणेच्य विरोधात पंचवटीनगरातील नागरिकांनासोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रज्ञ निमगडे यांच्यासह नागरिकांनी आहे.


याबाबत स्नेहल सेलिब्रेशन लॉनच्या मालकाशी दुरध्वनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्नेहल सेलिब्रेशन लॉनमध्ये साक्षगंध व वाढदिवस यासारखे छोटे कार्यक्रम होतात. लाऊडस्पीकर रात्री १० वाजतच्यानंतर बंद केल्या जाते. लाऊडस्पिकरचा आवाज नियमानुसारच ठेवला जातो. स्नेहल सेलिब्रेशन लॉनमध्ये चारचाकी वाहनांसाठी स्वतःची पार्किंगची व्यवस्था केली आहे. फटाके लॉनच्या गेटमध्ये फोडतात. उरलेले अन्न गुरांना चारण्यासाठी शेतकरी नेतात, इतरत्र खुल्या जागेत फेकत नाही. आमच्या स्नेहल सेलिब्रेशन लॉनमध्ये नियमानुसारच कार्यक्रम केल्या जातात त्यामुळे या लॉनपासून नागरिकांना कशाचाही त्रास होत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post