अस्वलाचा मृत्यू, शेतकऱ्याला अटक





मूल:  अंतरगाव पारडवाही येथील शेतात वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत्प्रवाहाने अंदाजे दोन वर्षांच्या नर अस्वलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. वनविभागाने या प्रकरणी आरोपी गोपीनाथ मंगरू शेंडे याला ताब्यात घेतले आहे. मूल येथील शेतकरी सुधीर कावळे याने आपली शेती सुभाषनगर मूलचे गोपीनाथ मंगरू शेंडे याला करण्यासाठी दिली. गोपीनाथ शेंडे यांनी वन्यप्राण्यांपासून मका पिकाच्या रक्षणासाठी महावितरणच्या पोलवरून आकडा टाकून शेताच्या सभोवताली तार लावून त्यात विद्युत्प्रवाह सोडला होता.


Post a Comment

Previous Post Next Post