होळीच्या दिवशी सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार


बेगुसराय : होळीच्या दिवशी (Holi Festival) बेगुसराय इथं एका सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना घडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीये.

एसपी योगेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी साहेबपूर कमल पोलिस स्टेशन (Sahebpur Kamal Police Station) हद्दीतील पचवीर चौकाजवळ दुसऱ्या समुदायातील मुलानं दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचं वृत्त आहे. माहिती मिळताच बलियाचे डीएसपी आणि साहेबपूर कमल पोलीस ठाण्याचे प्रमुख घटनास्थळी पोहोचले. पीडित मुलींना बेगुसराय येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पचवीरच्या दोन अल्पवयीन मुली बुधवारी दुपारी काही वस्तू घेण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. बाजारातून परतत असताना दोन्ही मुली शाळेच्या आवारात लावलेल्या झुल्यावर खेळत होत्या. दरम्यान, शाळेच्या शेजारी सुरू असलेल्या चहाच्या टपरीतून दोन मद्यधुंद तरुण तिथं आले आणि त्यांनी मुलींचा विनयभंग सुरू केला.

Post a Comment

Previous Post Next Post