अवैध करंट लावुन शिकार करण्याचा प्रयत्न फसला तिन आरोपींना अटक तर एक फरार



 *_चामोर्शी वनपरिक्षेत्राची कारवाई_* 

चामोर्शी:- चामोर्शी वनपरिक्षेत्रा अंतर्गत अड्याळ -१ नियतक्षेत्रात दिनांक 09.03.2023 रोजी रात्रो चामोर्शी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी सामुहिक गस्त करीत असतांना जंगल परिसरात अवैध्य तार पसरवून करंट लावलेला दिसला तेव्हा वन कर्मचाऱ्यांनी विद्युत विभागाशी संपर्क साधून सदर क्षेत्रातील लाईन खंडित करण्यास सांगितले व आरोपींवर पाळत ठेवली असताना रात्रीच्या वेळेस 04 संशयित इसम पसरविलेला तार गोळा करताना आढळून आले त्यांचा पाठलाग केले असता 03 इसम मिळाले व एक पळून गेला. पकडलेल्या इसमांची चौकशी केली असता त्यांनी जंगल परिसरात विद्युत करंट लावुन शिकार करण्यासाठी आलेलो आहोत असे सांगितले. 1.अरुण किर्तीमंतराव मडावी, 
2. संतोष संन्याशी कुळमेथे दोघेही प्रियदर्शनी 
व 3. जागेश्वर देवराव घोडाम रा.रश्मीपुर अशी आरोपींची नावे आहेत.
      चार आरोपीं विरुध्द वनगुन्हा क्रमांक. 08174/204328/08/2023 दि. दि.10/03/2023 अन्वये वनगुन्हा नोंद करून तिघांना अटक करून दि.11.03.2023 रोजी मा. न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांचे दालनात हजर करण्यात आले.
या घटनेचा पुढील तपास मा.राहुलसिंह टोलीया ,उपवनसंरक्षक वनविभाग आलापल्ली, श्री.प्रदिप बुधनवर प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, आलापल्ली यांचे मार्गदर्शनाखाली श्री.आर.बी.इनवाते वनपरिक्षेत्र अधिकारी,चामोर्शी यांच्या नेतृत्वात श्री.ए.व्ही.लिंगमवार क्षेत्र सहाय्यक, चामोर्शी श्री.एम.आर.कोसरे, वनरक्षक अड्याळ-1, विठ्ठल मेश्राम वनरक्षक, आनंद साखरे वनरक्षक चामोर्शी, किशोर वैरागडे, अक्षय राऊत वनरक्षक, विकास लांजेवार वनरक्षक,दिपक दुधबावरे वाहन चालक, ईश्वर जनबंधू वनमजुर, सखाराम पेदापल्लीवार व सुभाष पिटाले मंजुर आदी कर्मचारी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post