गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज द्या* अशी मागणी मनसे तालुका-संघटक आशुतोष गिरडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली



आरमोरी :- गडचिरोली जिल्ह्यात शासकीय रूग्णालयाची संख्या कमी आहे. तसेच डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे येथील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ११ लाख लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात यावे,११ लाख नागरिकांना आरोग्याची सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यात ४५ आरोग्य केंद्र तसेच अनेक उपकेंद्र आहेत.गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात २५१ खाटांची तर नव्याने सुरू झालेल्या महिला व बाल रूग्णालयात १०० खाटांची व्यवस्था आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता येथे वैद्यकीय अधिकारी रूजू होऊन सेवा देण्यास तयार होत नाही. त्यामुळे गडचिरोलीतील अनेक रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे वर्षानुवर्ष रिक्त राहतात. या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात यावे. गडचिरोली जिल्ह्यात कितीतरी वर्षापासून विद्यार्थी मेडिकल कॉलेजसाठी मागण्या करात आहे तरीही विद्यार्थ्यांना या जिल्ह्यात कॉलेज देण्यात येत नाहीत, तर ते विद्यार्थी या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात त शिकायला जातात.
काही असे विद्यार्थी आहेत की त्यांच्या कडे शिकण्यासाठी पैसे नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट कॉलेज व हॉस्टेलची सोय करून द्यावे. अशा मागण्या विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग करत आहे. या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आरमोरी तालुका-संघटक आशुतोष गिरडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Post a Comment

Previous Post Next Post