त्या' मार्गावर प्रेमी युगुलांचा वावर



मारोडा : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सोमनाथ पर्यटन स्थळाच्या मार्गावर प्रेमी युगुलांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या प्रकारामुळे तरुणाईबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सोमनाथ हे मूल तालुक्यातील निसर्गाची देणगी लाभलेले विलोभनीय ठिकाण आहे. तेथील लहानसा धबधबा व सर्व ऋतूंत बहरलेला हिरवाकंच परिसर, पर्यटकांना आकर्षित करत आहे. बाजूला असलेल्या सोमनाथच्या हेमाडपंथी मंदिरामुळे तेथील वातावरण पवित्र असते. यामुळे येथे बालगोपालापासून वृद्धही मोठ्या प्रमाणात येताना दिसून येतात. अरुंद झाडीवाटेने गेल्यास पुढे महारोगी सेवा समितीचे जागतिक कीर्तीचे सोमनाथ प्रकल्प आहे. त्याच्यामुळे देश-विदेशांतील पर्यटक या स्थळाला भेट देत असतात; परंतु मागील काही दिवसांपासून मारोडा सोमनाथच्या रस्त्यावर प्रेमी युगुलांची जोडपी नजरेस पडत आहेत. यापूर्वी ती मंदिरामागील वनराईचा आसरा घेत होती. तेथे निवांत बसून गप्पागोष्टी करीत होती; परंतु वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे ते रस्त्यावर आढळून येतात. त्यामुळे या नैसर्गिक ग्रामीण भागावर वेगळी छाप पडत आहे. याचे मुलांवर वाईट परिणाम पडू शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post