पोलिस स्टेशन पुराडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा मोठ्या उत्साहात साजरा..




जिल्हा पोलिस प्रशासना अंतर्गत पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून,मा.पोलीस अधिक्षक श्री.निलोत्पल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता व उपविभागीय पोलिस अधीक्षक साहील झरकर कुरखेडा यांचे मार्गदर्शनात जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
       सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती डॉ.सरिता ठलाल पुराडा,उदघाटक श्रीमती कौशल्या मारगाये मॅडम शेती उत्पादन कंपनी चेअरमन कुरखेडा, प्रमुख पाहुणे श्रीमती नीता आत्राम महिला पोलीस अंमलदार पोलिस स्टेशन पुराडा, श्रीमती नेवजाबाई अत्यालगडे मॅडम, लाडे मॅडम, पोलीस स्टेशन परिसरातील महिला पोलीस पाटील हजर होते.

                  मंचावर उपस्थित विविध विभागाच्या महिला कर्मचारी होत्या.त्यानी आपाआपल्या विभागातील विविध योजनांची माहिती दिली.व त्याच प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम महिला वर्गानी सादर केले.
              कार्यक्रमांचे प्रास्ताविक पोलीस अंमलदार गौतम दुर्गे यांनी केले. तर सुत्र संचालन पोलीस अंमलदार चिंतन कावरे यांनी केले. आभार प्रदर्शन पोलीस अंमलदार प्रविन राऊत यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post