गुलाम बनवण्याचे षड्यंत्र ..... गर्भातच मुलांना ब्राम्हणी धर्मग्रंथ गीता-रामायण ऐकवून बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र



‘आरएसएस’च्या संवर्धिनी न्यासाच्या ‘गर्भ संस्कार’ मोहीमेतून ‘कुसंस्कारा’चा घाट
हजारो वर्षे बहुजनांना गुलाम बनवून भारतावर कब्जा केलेले विदेशी ब्राम्हण किती षड्यंत्रकारी असतात त्याचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. आता गर्भातच मुलांना ब्राम्हणी धर्मग्रंथ गीता-रामायण ऐकवून बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे. त्यासाठी आरएसएसच्या संवर्धिनी न्यासाच्या ‘गर्भ संस्कार’ मोहीमेतून ‘कुसंस्कारा’चा घाट घातला गेला आहे. त्यामुळे आरएसएसच्या या मोहीमेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

संवर्धिनी न्यास या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखेने आईच्या पोटातच मुलांना संस्कार देण्यासाठी ‘गर्भ संस्कार’ मोहीम सुरू केली आहे. यामध्ये गरोदर महिलांना गीता, रामायण, स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन आणि संघर्ष याविषयी माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून गर्भात वाढत असलेल्या बाळाला भारतीय संस्कृतीची माहिती देता येईल असा कांगावा करण्यात आला आहे.

रविवारी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी येथे संवर्धिनी न्यासच्या एका कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. त्या वेळी एम्ससह १२ राज्यांतील ७०-८० डॉक्टरही उपस्थित होते. या मोहिमेत स्त्रीरोग तज्ज्ञ, आयुर्वेदिक डॉक्टर आणि योग प्रशिक्षकांचा सहभाग आहे. त्या गरोदर महिलांकडे जाऊन त्यांना गीता आणि रामायण वाचण्यास आणि योगासने करण्यास प्रेरणा देतील. आपल्या मुलाला गर्भात भारतीय संस्कृतीबद्दल शिकवण्याबद्दल सांगितले जाईल.

राष्ट्रीय संघटन सचिव माधुरी मराठे म्हणाल्या की, महिलांनी गर्भारपणातच बालकांना संस्कार देण्याचे काम सुरू केले पाहिजे. आईच्या पोटात मुल ५०० शब्द शिकू शकते, असे त्यांनी सांगितले. ही मोहीम महिलेच्या गरोदरपणापासून सुरू होणार असून, मूल दोन वर्षांचे होईपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेद्वारे १००० महिलांपर्यंत पोहोचण्याची योजना आहे.

माधुरी मराठे यांनी जिजाबाईंचे उदाहरण दिले. त्यांनी नेत्याला जन्म देण्याची प्रार्थना कशी केली. आज भारतातील मातांनी जिजाबाईंप्रमाणे प्रार्थना करावी, जेणेकरून हिंदू राज्यकर्त्यांचे गुण त्यांच्या मुलांमध्ये रुजावेत, अशी फेेकामफेक त्यांनी केली.

एम्सच्या एनएमआर विभागाचे प्रमुख डॉ. रामा जयसुंदर म्हणाले की, अपंग आणि ऑटिझम असलेल्या मुलांची संख्या वाढत आहे. हे अशा पालकांच्या बाबतीत घडते जे आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि आरामदायी जीवन जगतात. जेव्हा जोडप्याने मुलाचा विचार केला, तेव्हाच गर्भसंस्काराचा कार्यक्रम सुरू होतो. त्यांनी सांगितले की, महिलांनी गरोदरपणात संस्कृतचा अभ्यास केला पाहिजे.  


असाच एक उपक्रम ऑक्टोबर २०१४ मध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुरू करण्यात आला होता. भोपाळच्या गर्भसंस्कार तपोवन केंद्राने दावा केला आहे की, हिंदू संस्कार आणि गर्भसंवादाद्वारे गर्भवती महिलांना निरोगी मुलाला जन्म देण्यास मदत केली जाते. येथे गरोदर महिलांचा संपूर्ण कोर्स नऊ महिन्यांचा आहे. ज्यामध्ये महिलांना भारतीय संस्कृती, गर्भधारणेपूर्वीची तयारी, ध्यान, मंत्र, प्रार्थना, गर्भसंवाद याविषयी सांगितले आहे. या केंद्राची प्रेरणा गुजरातच्या बालविद्यापीठातून घेतली गेली. असाच एक उपक्रम गुजरातमध्येही सुरू करण्यात आला, ज्याचे चांगले परिणाम दिसून आले अशी मखलाशी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post