आता दारू विकाल तर 1 बकरा आणि 5 हजार रुपये दंड द्यावा लागेल...


गडचिरोली : जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील ढेकणी गावाला दारूमुक्त करण्यात ग्रामस्थ, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूला यश आले आहे. आता जवळपास वर्षभराचा कालावधी पूर्ण होऊनही दारूबंदी कायम आहे. कायम दारूमुक्त गाव राहावे, शांतता टिकून राहावी, यासाठी ग्रामस्थांनी एकमताने दारूबंदीचा ठराव घेऊन जो कोणी दारू विक्री करणार त्याला ५ हजार रुपये व एक बोकड अशा स्वरूपातील दंड आकारण्याचा निर्णय या गावाने घेतला आहे.


ढेकणी हे गाव गेल्या एक वर्षांपासून दारूविक्री मुक्त गाव आहे. या गावातुन अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांना वारंवार नोटीस देणे, दारूविक्रीचा व्यवसाय बंद करण्यासंदर्भातील हमीपत्र लिहून घेण्यात आले. तसेच या गावाने नुकतेच विजयस्तंभ उभारला आहे. अशा विविध उपायोजना करून गावातून अवैध दारू हद्दपार करण्यात आली.

या कार्यक्रमाला गाव पाटील दिवाकर नरोटे, सुखदेव कुमोटी, रवींद्र गावडे, अर्जुन मडावी, लक्ष्मण कोंदामी, भाष्कर कुमोटी, अजय कुमोटी, वनिता मठ्ठामी, निवृता कुमोटी, सुनीता कुमोटी, देवला गावडे, मानि ताडामी, रुपाली मट्ठामी, सोनाली कोवासे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post