नक्षल्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद




- पोलीस विभागात खळबळ, चकमक सुरु




दंतेवाडा, 26 एप्रिल : छत्तीसगडच्या दंतेवाडा मध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची खळबळजनक माहिती पुढे येत आहे. यात हल्ल्यात शहिद झालेल्यांमध्ये 10 डीआरजी ( DRG) जवान आणि एका ड्रायव्हरचा समावेश झाला आहे. दंतेवाडाच्या अरनपूरमध्ये नक्षल्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला यात हे जवान शहीद झाल्याचे कळते तर नक्षल आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु असल्याचीही माहिती पुढे येत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, सदर घटना अत्यंत दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. ही लढत अंतिम टप्प्यात आहे. नक्षल्यांना सोडले जाणार नाही. सदर घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचे शोक व्यक्त करण्यात येत आहे.




छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरजवळ ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी रस्त्यात पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. याच रस्त्यावरून छत्तीसगडच्या पोलिसांचे वाहन जात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला. यात स्फोटात छत्तीसगडच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे ११ जवान शहीद झाले आहेत.




छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. नक्षलवादी हल्ला झाल्याची माहिती आहे. अतिशय दुःखद घटना आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयां दुःखात आपलण सहभागी आहोत. ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post