गडचिरोली : ट्रकच्या अपघातात 2 ठार, चालक गंभीर जखमी



गडचिरोली: अचानकपणे समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविताना ट्रकची शहीद स्मारकाला धडक बसली व ट्रक थेट ग्रामपंचायतच्या आवारात घुसला या अपघातात ट्रकमधील एक प्रवाशी व एक पैदल येणारा इसम असे दोघे जण ठार तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिरोली मुल मार्गावरील नवेगाव येथे 30 एप्रिल रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

मुखरू रघु गोमस्कर वय 60 वर्ष रा. मुरखळा ता. जि. गडचिरोली असे या अपघातातील मृतक. पादचाऱ्याचे नाव असून ट्रकमधील प्रवाशी असलेल्या दुसऱ्या मृतक व्यक्तीचे नाव कळू शकले नाही. पिंटू राजपाल मजोके वय 35 वर्ष रा किसाननगर ता. सावली जि. चंद्रपूर असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे.

सदर ट्रक चा चालक पिंटू मजोके हा किसानगर चा रहिवासी असून तो आपल्या घरी जाण्याकरिता ट्रक घेऊन गडचिरोली वरून किसाननगर कडे निघाला असता गडचिरोली शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव ग्रामपंचायत समोर अचानक एक दुचाकीस्वार आला त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकची ग्रामपंचायत समोरील शहीद स्मारकाला धडक बसली व तो थेट ग्रामपंचायत आवारात घुसला यात दोघे जण ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व ट्रकमध्ये दाबुन असलेल्या मृतांचे मृतदेह बाहेर काढले.

Post a Comment

Previous Post Next Post