दंगलीत झालेले नुकसान आरोपींकडून वसूल करण्यात येणार; नुकसानीचा आकडा पुढीलप्रमाणे..



💁🏻‍♂️ रामनवमीच्या पूर्वसंध्येला छ्त्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागातील राम मंदिरासमोर झालेल्या दोन गटांच्या राड्यात जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून या प्रकरणात आरोपींची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे, मात्र आता दंगेखोरांना पोलीस आणखी एक दणका देण्याच्या तयारीत आहेत. या दंगलीत दगडफेक आणि जाळपोळीत झालेले नुकसान दंगेखोरांकडूनच भरपाई करण्याचा कायदा आहे. त्यानुसार पोलिस सविस्तर अहवाल तयार करीत असल्याचे समोर आले आहे. हा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल आणि त्यानंतर गुन्ह्याच्या निकालावेळी न्यायालयाच्या शिक्षेत नुकसानभरपाईचा आदेश दिले जातील असा पोलिसांना विश्वास आहे.  

💥 29 मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. गल्लीबोळातून अचानक येणाऱ्या या जमावाने पोलिसांची 14 वाहने अक्षरशः पेटवून दिली. स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही आणि पथदिवे फोडून टाकले. त्यामुळे आता पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरू केली आहे. 

▪️ *पोलिसांचे झालेले नुकसान* (अंदाजे) 

● पोलिसांची जळालेली 14 सरकारी वाहने : एक कोटी रुपये
● खासगी वाहने : 8 ते 10 लाख रुपये
● वायरलेस, जीपीएस, पीए सिस्टीम : 8 ते 10 लाख रुपये
● स्मार्ट सिटी सीसीटीव्ही नुकसान : 2 लाख रुपये
● राम मंदिराचे नुकसान : 1 लाख 
● स्थानिकांचे नुकसान : 10 ते 12 लाख 
● पथदिवे : 1 लाख रुपये


Post a Comment

Previous Post Next Post