गडचिरोली जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल ची बैठक संपन्न ,भाजप कडून ओबीसी समाजाची दिशाभुल - महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष



गडचिरोली: भाजपा हा ओबीसी द्रोही पक्ष असून सत्तेकरीता फक्त ओबीसींच्या मतांचा वापर करून घेतात. केंद्रात पूर्ण बहुमतात सत्ता असताना सुद्धा मागील आठ - नऊ वर्षापासून ओबीसींच्या हिताकरिता कोणताही मोठा पाऊल उचलल्याचे दिसत नाही. ओबीसी ची जनगणना व्हावी याकरिता विविध स्तरावरून मागणी होत असताना सुद्धा सरकारने त्याकडे सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मात्र केंद्रातील हुकूमशाही सरकारच्या विरोधात अदानी समूहाची चौकशी करण्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुलजी गांधी सतत आवाज उचलत असताना त्यांचा आवाज दाबण्याकरिता त्यांची खासदारकीभाजप कडून रद्द केली जाते. सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांचे पैसे घेऊन निरव मोदी, ललित मोदी सारखे चोर माणस पैसे घेऊन फरार होतात आणि त्याच मोदींना चोर म्हटले म्हणून राहुल गांधींनी पूर्ण मोदीचा आणि मोदी म्हणजेच पूर्ण ओबीसी समाज आहे असे खोटे चित्र दाखवण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचा काम भाजप सरकार करीत आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या आढावा बैठकीनिमित्त अध्यक्ष म्हणून ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले काँग्रेसमध्ये असलेल्या प्रत्येक ओबीसी बांधवांनी व कार्यकर्त्यांनी भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याकरिता प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले.


बैठकीला माजी आम. डॉ. नामदेवराव उसेंडी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष भूपेश कोलते, कार्याध्यक्ष दिवाकर निसार, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी, विनोद लेनगुरे, पांडुरंग घोटकर, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंतराव राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, सुरेश भांडेकर, नंदू कायरकर, अनिल कोठारे, नितीन राऊत,रजनीकांत मोटघरे, मनोज ढोरे, दत्तात्रय खरवडे, राजाराम ठाकरे, बाळू निखाडे, श्रीनिवास ताडपलीवार, निकेश भैय्याजी कत्रोजवार, अशोक नैताम, बाळूजी मरसकोल्हे , एकनाथ भोयर, नीलकंठ गोहणे, तूकाराम खेवले, लोमेश सेलोटे, अरविंद फटाले, रवींद्र गंधाटे, लीलाधर सुरजागडे, संजय चन्ने, चोखाजी भांडेकर, अनिल भांडेकर, लालाजी सातपुते, अनिल किरमे, राजेश ठाकूर, सुरज सोमनकर, दिवाकर पोटफोडे, अरुण भादेकर, जितेंद्र तुपट, संदीप वाघाडे सचिन झिलपे योगेंद्र, झंजाळ, महादेव भोयर, पंकज खोबे, मोठ्या संख्येने ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post