जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे शाळापूर्व तयारी मेळावा थाटात संपन्न*


     दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

         दि.२४ एप्रील २०२३ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे शाळापुर्व तयारी प्रथम मेळाव्याचे मोठया उत्साहात आयोजन करण्यात आले.
----------------------------------------
      
           राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी, कोरोना काळात झालेले शैक्षणिक नुकसान, पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या बालकाची शाळापुर्व तयारी या उदात्त हेतूने प्रथम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.


           मेळाव्याला उद्घाटक म्हणून सरपंच सौ. कविताताई ताडाम, अध्यक्ष श्री. दिनेशजी बनकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोसबी, श्री. विनोदजी मानकर उपाध्यक्ष शाव्यस, श्री. प्रलयजी चहांदे उपसरपंच कोसबी, रोहिदासजी सहारे, राजेशजी दुमाणे, संदीपजी बोदेले, प्रकशजी बनकर, गुलाबजी ताडाम, विनोदजी शंभरकर, विश्वनाथ सोनटक्के मुख्याध्यापक, सौ. अनुरता मुल्लेवार, शामलता घोडाम अंगणवाडी सेविका, श्री. गणेश चौधरी, इयत्ता पहिली ला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या माता आदी उपस्थित होते. केंद्रांचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख मा.राजेश वडपल्लीवार सर मेळाव्याला आकस्मिक भेट देऊन माता पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घ्यावा असे शपथेच्या माध्यमातून वदवून घेतलं व मेळाव्याचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनातून विषद करुन सांगितलं. 
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
मेळाव्यामध्ये एकूण ७ स्टॉल लावण्यात आले.

यामध्ये
👇 

🔴 विकासपत्र, विद्यार्थ्याची नोंदनी

🔴 शारीरिक विकास

🔴 बौद्धिक विकास

🔴 सामाजिक आणि भावनिक विकास

🔴 भाषा विकास 

🔴 गणनपूर्व तयारी

🔴 माताना साहित्य वाटप व समुपदेशन 

            वरील घटकांवर आधारित विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यात आल्या.

शाळापुर्व तयारी मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद, विदयार्थी, गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग देत मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

          मेळाव्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ सोनटक्के सर, सूत्रसंचालन श्री. प्रशांत ठेंगरे सर, तर आभारप्रदर्शन श्री. गणेश चौधरी सर यांनी केले.

             शेवटी सहभोजनाने मेळाव्याची सांगता करण्यात आली.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

Previous Post Next Post