3 वर्षानंतर धान विक्री करणाऱ्या बारदानाचे 20 रू प्रमाणे पैसे परत मिळणार...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
गोंदिया : शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळ संचालित हमीभाव खरेदी केंद्रांवर २०१९-२० मध्ये धनाची विक्री केली. मात्र, महामंडळाव्दारे संचालित केंद्रांवर बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांकडील बारदान घेतला होता. त्या बारदानाची तीन वर्ष लोटून देखील परतावा केला नव्हता. अखेर या प्रकाराची लोकायुक्तांकडे आदिवासी महामंडळाचे कान टोचल्यानंतर अखेर आता महामंडळाने १८ लाख बारदान्याचे २० रूपये दराने पैसे परत करणे सुरु केले.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन घेतले जाते. त्या धानाची खरेदी शासनामार्फत हमी भाव खरेदी केंद्रावरून करण्यात येते. याकरिता पणन अधिकारी कार्यालय आणि आदिवासी विकास महामंडळांना अधिकार देण्यात आले आहेत. आदिवासी विकास महामंडळातर्फे सब एजन्ट म्हणून खरेदीकरीता आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था खरेदीचे अधिकार देण्यात आले होते. २०१९-२० हंगामात आदिवासी विििस महामंडळाच्या खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध नव्हता. त्यामुळे आदिवासी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडील बारदाना घेतला होता. त्या मोबदल्यात लवकरच बारदाना किंवा २० रूपये प्रती बारदाना देण्याचे कबूल केले होते. मात्र, तीन वर्ष लाटून देखील बारदाना परत करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बारदाना किंवा त्याची रक्कम याकरिता आदिवासी विकास महामंडळाकडे वारंवार मागणी केली. परंतु, महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप देखील करण्या आला होता. गेल्या तीन वर्षापासून महामंडळाकडे ३७ कोटी रूपये बारदान्याचे देणे होते. माहिती अधिकार कार्यकर्ते रोशन बडोले यांनी याची तक्रार थेट नाशिक येथील लाकायुक्ताकडे केली.

♐♐♐♐♐♐♐♐♐♐♐♐

दरम्यान त्यांनी बारदाना किंवा बारदान्याचे पैसे देण्यात यावे अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील दिला होता. यामुळे लोकायुक्तांनी आदिवासी विकास महामंडळाचे कान टोचले. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवसीपक जयसिंह राठोड यांनी शेतकऱ्यांना २० रूपये प्रती बारदाना याप्रमाणे पैसे परत करण्याचे आदेश पारित केले. या निर्णयामुळे आता गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे बारदान्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

♓♓♓♓♓♓♓♓♓♓♓♓

आदिवासी विकास महामंडळाकडे केवळ गोंदिया भंडाराच नव्हे तर पालघर, ठाणे, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील पैसे होते. तेथील शेतकऱ्यांना देखील आता बारदान्याचा परतावा मिळणार आहे. याकरिता ३६ लाख ५१ हजार बारदान्यासाठी २० रूपये प्रती बारदाना प्रमाणे ७२ कोटी १० लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांना वळता करण्यात आला आहे.


पैसे परत करणे सुरु
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा १८ लाख बारदाना महामंडळाकडे होता. तीन वर्षानंतर महामंडळाने आता ज्या शेतकऱ्यांकडील बारदाना घेतला होता. त्यांना २० रूपये दराने आता बारदान्याचा परतावा सुरु केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उशिरा का होईना न्याय मिळाला असून त्याकरिता शेतकऱ्यांनी रोशन बडोले यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post