उभ्या मक्यात रानडुकराचा 'धिंगाणा डान्स'





 कराडी : उन्हाळी मका पीक शेवटच्या टप्प्यात असताना रानडुकरांनी रात्रीच्या वेळी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मका पिकाच्या झालेल्या नुकसानीची वनविभागाकडून पाहणी होऊन आर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कुरखेडा तालुक्यातील कराडी येथील शेतकरी लोकनाथ उईके यांनी तीन एकर जागेत मक्याचे पीक लावले आहे. खत, पाणी करून योग्य जोपासना केल्यानंतर, आता हे पीक बहरात असताना मागील चार दिवसांपासून मक्याच्या शेतात रानडुकरांचा हैदोस सुरू झाला आहे.

मका पिकाची नासाडी केली आहे. रानडुकरांमुळे झालेल्या हानीची वनविभागाने पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी लोकनाथ उईके यांनी केली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post