वाघाने उडविली झोप





वडधा:  आरमोरी तालुक्यातील वडधा येथे वाघाच्या दहशतीने नागरिक हैराण आहेत. भीतिपोटी शेतीकामांवर परिणाम झाला असून, दुर्गम भागातील मजूरवर्गही दहशतीत आहे. वडधा परिसरात अनेक मजूर कुटुंबांकडे गॅस नाही. त्यामुळे त्यांना जंगलात जाऊन सरपण गोळा करावे लागते, पण वाघामुळे जंगलात जाणे जिकरीचे ठरत आहे. या भागात काही दिवसांपूर्वी एका वाघिणीसह तिच्या पिलांचे नागरिकांना दर्शन घडले होते, त्यामुळे नागरिकांत मोठी दहशत निर्माण झाली आहे.

मोहा, टोर, डिंक, हिरडा, बेहडा असे अनेक वनस्पतीपासून मिळणारे उत्पादन गोळा करून, अनेक जण रोजगार मिळवतात, पण जीव धोक्यात घालून जंगलात जायचे कसे, असा प्रश्न मजुरांसमोर आहे. वाघासह हिंस प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post