बापरे ! मक्याच्या शेतात चक्क पट्टेदार वाघाचे बस्तान



मक्याच्या शेतात वाघाला शोधताना गावकरी.


 घोसरी नांदगाव येथील भास्कर आंबटकर यांच्या मक्याच्या शेतात पट्टेदार वाघाने शनिवारी दुपारच्या सुमारास बस्तान मांडले. ही बाब माहीत होताच वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. वनकर्मचारी व पोलिस लागलीच घटनास्थळी दाखल झाले.

पोंभूर्णा वन परिक्षेत्राअंतर्गत घोसरी उपक्षेत्रात अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर असून मागील महिन्याअगोदर नांदगाव शिवारात एका वाघाचा मृत्यू झाला होता. .

घटनेची शाई वाळते न वाळते तोच शनिवारी भास्कर आंबटकर यांच्या मक्याच्या शेतात वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

एवढेच नव्हे तर खेडी-गोंडपिपरी महामार्गाच्या लागून असलेल्या शेतात वाघाचे दर्शन झाल्याने बघ्यांनी गर्दी केली. त्यामुळे वाघाने मक्याच्या शेतात बस्तान मांडले. घोसरी बिटाचे क्षेत्र सहायक अजय बोधे, वनरक्षक प्रमोद दुधबळे, वनकर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post