लग्न अयशस्वी झाल्यावर वधूने पंडीत - ब्राह्मणाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा केला दाखल :-



रोहतक येथे एका मुलीने कुंडलीव्दारा लग्न जमवून पैसे घेऊन अंदाज चुकीचा ठरल्याबद्दल स्थानिक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

प्रत्यक्षात असे घडले की, रेखा मलिक या मुलीचे लग्न हरियाणाच्या विक्रम सिंहसोबत झाले होते. ब्राह्मण-पंडीत ब्रह्मदत्त शर्मा यांनी दोघांच्या कुंडली जुळवून त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होईल आणि त्यात कोणताही अडथळा येणार नाही असे सांगितले. ब्राह्मण -पंडित ब्रह्मदत्त शर्मा याबद्दल सुमारे ₹ 11000 (अकरा हजार रुपये) घेतले.

खोटे दावे आणि भविष्यवाणी केल्याबद्दल मुलीने ब्राह्मण -पंडित विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बऱ्याच अनाकानीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला...

आणि ब्राह्मण -पंडितजींना तुरुंगात पाठवण्यात आले. कुंडली बनवून किंवा मंत्रोच्चार करून काहीही होत नाही, असा विश्वास पाेलिसांचा होता. हा फक्त कमाईचा धंदा आहे आणि हे सर्व बंद व्हायला हवे. पहिल्यांदाच कोणीतरी असा प्रकार घडवण्याचे धाडस केल्याचे पोलिसांनी सांगितले. अशीच प्रकरणे होत राहिल्यास भोंदूगिरीने होणारी फसवणूक खूप कमी होईल.

सुशिक्षित ,शिक्षित समाज शिक्षण घेऊन सत्य-असत्य जाणूनही ब्राह्मणांच्या कर्मकांडे व कुंडलीच्या फे-यात अडकून आपले शोषण करुन घेतो यासाठी आता विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून वागले पाहिजे..

स्रोत- जागरण वार्ताहर

Post a Comment

Previous Post Next Post