अल्पवयीन मुलीवर प्रेमाच्या बहाण्याने केला अत्याचार




आरोपी जेरबंद : पीडिता सहा महिन्यांची गर्भवती

चामोर्शी / घोट : चामोर्शी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केल्याची घटना 3 एप्रिलला समोर आली. दरम्यान, पीडिता सहा महिन्यांची गर्भवती असून, गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रफुल्ल वसंत वाघाडे (वय २६, रा. निमरड टोला) असे आरोपीचे नाव आहे.

नात्यातील एका अल्पवयीन मुलीशी प्रफुल्ल यांचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमाच्या नावाखाली मुलीला जाळ्यात ओढून त्याने तिच्या घरी वारंवार अत्याचार केला. यातून तिला गर्भधारणा झाली. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर रुग्णालयात तपासणी केली असता, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


त्यावरून प्रफुल्ल वाघाडेवर अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा नोंद झाला. पीडितेला गडचिरोली येथे वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले आहे

पाच दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यास ३ एप्रिलला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उपनिरीक्षक नंदकुमार शिबे तपास करत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post