देऊळगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात वैरागड येथील एक युवक ठार तर दोन जखमी




व्हिडियो जरूर बघा
👇👇👇👇👇👇👇


आरमोरी : मित्राचे लग्न आटोपून घरी परतताना दुचाकीला कारने जोराची धडक दिली. यात एक ठार झाला, तर दोघे जखमी झाले. ही घटना आरमोरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगावनजीक ३ एप्रिलला दुपारी दोन वाजता घडली.


संजय माधव धनकर (वय ४०, रा. वैरागड ) असे मृताचे नाव असून, सोपान हनू बावणे (२२, रा. वैरागड), लोमेश नवघरे (४०, गणेशपूर) हे दोघे जखमी आहेत.


आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील पिंकू दुमाने याचा आरमोरी तालुक्यातीलच सूर्यडोंगरी येथील तरुणीशी ३ एप्रिलला विवाह झाला.


लग्नसोहळ्यासाठी संजय धनकर, सोपान बावणे व लोमेश नवघरे हे तिघे मित्र दुचाकी (एमएच ३३यू- ८१०१) वरून ट्रिपलसीट गेले होते. लग्न आटोपून परतताना आरमोरी- गडचिरोली महामार्गावरील देऊळगावजवळ वर्धा येथून गडचिरोलीकडे जाणाऱ्या भरधाव कार (एमएच ३२ एएच ६६७७) ने समोरासमोर जोराची धडक दिली. तिघांनाही आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने संजय धनकर यांचा ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यू झाला

Post a Comment

Previous Post Next Post