ब्रम्हपुरी: विज पडून इसमाचा मृत्यू


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

ब्रम्हपुरी.-

तालुक्यातील धानोलीपोहा चक येथे विज पडून इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक:- २२ एप्रिल २०२३ ला ५:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. श्री. नवलाजी बळीजी लडके वय अंदाजे ४० असे वीज पडुन दुर्दैवी मृत्यु झालेल्या इसमाच नाव आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की मृतक नवलाजी हे गावातील लोकांनी दिलेल्या माहिती नुसार घरच्या म्हशी राखायला गेला असल्याने चार पाच दिवसापासून तालुक्यातच नाही तर विदर्भात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाने हजेरी लावली असुन आज सुद्धा अवकाळी पावसाने विजांच्या कडडाटासह हजेरी लावली त्या मध्ये म्हशी चारत असतांना नवलाजी च्या अंगावर विज पडून नवलाजीचा मृत्यु झाला. मृतक नवलाजीच्या पच्छात्य आई पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. नवलाजी अत्यंत मनमिळावू स्वभावाचा व कुटुंबातील कर्ता इसम असुन त्याच्या जाण्याने लडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच गावपरीसर शोकसागरात बुडालेला आहे.





*सर्तक रहावे*
*राज्यात 10 दिवस पावसाळ्या सारखा महाराष्ट्रात पाउस कोसळणार- पंजाब डख*

 *दि. 24 एप्रील ते 2 मे सर्वानी विजा, गारपीठ, वारे ,स्वताचे, पिकांचे, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी . - पंजाब डख* 

ज्यांनी गारपिठ कसी होते कधी पाहिली नाही त्यांना पहायला दिसेल.

*पूर्व-सुचना*
*राज्यातील सर्वानी 24 एप्रील पासून 2 मे दहा दिवस विजा वारे पाउस गारपिठ या पासून स्वःतची पाळीव प्राणी, , हळद , इतर पिके काळजी घ्यावी कारण 24 एप्रील पासून राज्यात भाग बदलत 2 मे पर्यंत दहा दिवस पाउस पडणार आहे तरी अंदाज लक्षात घेउन शेतीचे कामे करून घ्यावी*

🔴 *पूर्वविदर्भ* . दि 21,22,23,24,25,26,28,29, तुरळक भागात दररोज भाग बदलत पाउस काही ठिकाणी वारा तर कुठे गारपिठ असेल .
🟡 *उत्तर महाराष्ट्र* दि .22,26,27,28,29,30 या तारखेत भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भगात गारपिठ तर कुठे पाउस पडेल .
🔴 *मराठवाडा* दि . 25,26,28,29, 30 या तारखेत भाग बदलत काही ठिकाणी गारपिठ ,वारा ,विजा, पाउस असेल .
🟡 *दक्षिण व प . महाराष्टू* दि .26,27,28,29,30 दरम्याण काही ठिकाणी गारपिठ वारे विजा पाउस असेल .
🔴 *प-विदर्भ-* दि .25,26,26,28,29,30 या तारखेत भाग बदलत काही भागात गारपिठ . कुठे वारे कुठे पाउस असेल .

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.* 

*नाव : पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*
*दि 21/ 04/2023*

Post a Comment

Previous Post Next Post