मारहाण प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल





गडचिरोली : एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राणी आहुजा व विनोद अशी त्यांची नावे आहेत.

तक्रारकर्ती नफीसा बेगम शेख रफीक कुरेशी ही गडचिरोली येथील चनकाईनगरात वास्तव्यास आहे. तिने आज गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबाबत माहिती दिली. तिने सांगितले की, २९ मार्चला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राणी आहुजा ही तिच्या दुकानासमोर येऊन शिविगाळ करू लागली. त्यावेळी नफीसा ही दुकानात नव्हती. दुकानात काम

करणाऱ्या मुलींनी तीला याबाबत मोबाईलद्वारे माहिती दिली. त्यानुसार नफीसा दुकानात दाखल झाली. यावेळी राणी हिने शिवीगाळ व भांडण करून चा पती विनोद याच्यासोबत मिळून मारहाण केल्याचा आरोप नफीसा हिने केला आहे. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी राणी व विनोद विरोधात भांदवी कलम ३२३, ३२४, ३४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरिक्षक अरविंद कतलाम यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post