विचित्र अपघात: कार अपघातात तरुण ठार







कार 500 फूट शेतात पडली

 अर्जुनी मोरगाव : भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित झाल्याने ती शेतात सुमारे ५०० फूट लांब अंतरावर गेली. अपघातग्रस्त कार जिथे उभी आहे तिथून सुमारे १०० फुटावर शेजारच्या शेतात तरुणाचा मृतदेह होता. सोमवारी (दि. ३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा विचित्र अपघात अर्जुनी शहरापासून १ किमी अंतरावर घडला. या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव डेव्हिड धनराज रहेले (१९, रा. बरडटोली) असे आहे.

डेव्हिड हा नागपूर येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. पहिल्या सत्राच्या परीक्षा आटोपल्यावर तो गावाकडे आला होता.

त्याचा मित्र वैभव उमेश राजाभोज हा सोमवारी (दि. ३) सकाळी कार घेऊन आला. कारमध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले व दोघेही नवेगाव बांधच्या दिशेने निघाले होते. वैभव कार चालवत होता व कार सुसाट वेगाने जात असल्याचे अनेकांनी बघितले. अर्जुनीपासून सुमारे अर्धा किमी. अंतरावर जाताच कार अनियंत्रित झाली. ती रस्त्याला लागून असलेल्या शेताचे धुरे पार करत कार ५०० फुटांवर जाऊन थबकली. एवढेच नव्हे तर कार ज्या ठिकाणी थबकली तिथूनही सुमारे १०० फुटांवरील शेजारच्या शेतात डेव्हिडचा मृतदेह पडला होता. यावरून अपघातग्रस्त कारच्या वेगाची कल्पना येऊ शकते. या अपघातात वैभवलादेखील दुखापत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post