मुलगी बघायला गेला अन् मुलीच्या आईला घेऊन पळाला


पश्चिम बंगालमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. मुलीला पाहायला आलेल्या तरुणाला तिची आई पसंत पडली आणि त्यानंतर तरूणासोबत तिची आईच पळून गेली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने पत्नीविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

पश्चिम बंगालच्या मालदा येथील इचाहार गावात 25 मार्च रोजी ही घटना घडली आहे. गजोल असे महिलेच्या पतीचे नाव आहे,. त्याने तिला बरंच शोधल्यानंतरही ती सापडली नाही. गजोलच्या म्हणण्यानुसार, त्यांची मुलगी लग्नाच्या वयात आली आहे आणि तिच्यासाठी आम्ही वराच्या शोधात आहोत. 25 मार्च रोजी एक तरूण आमच्या मुलीला पाहायला आला. मात्र तो माझ्या पत्नीला घेऊन फरार झाला. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, महिला आपल्या तीन मुलांना सोडून मुलीला बघायला आलेल्या तरूणासोबत पळाली. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. स्थानिय पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. गजोल आपल्या पत्नीचा फोटो घेऊन सगळीकडे तिला शोधत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनी आपली

पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्या महिलेला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरत महिलेला शोधून काढणार असल्याचा विश्वास पोलिसांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post