रिपब्लिकन पक्षाच्या जन संपर्क अभियानात शेकडो नागरिकांचा सहभाग



गडचिरोली -- अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज रिपब्लिकन जनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली तालुक्यातील अनेक गावांचा दौरा करून शेकडो लोकांशी संवाद साधला. मोहझरी, नगरी, पोर्ला, वसा, वसा टोली, नवरगाव, चर्चुरा आणि गोगाव (आडपल्ली) येथील लोकांनी या यात्रेचे भव्य स्वागत केले आणि पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने स्वीकारले.
 या यात्रेचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश सचिव प्रा.राजन बोरकर, केशवराव सम्रुतवार, गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, युवक अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ता चंद्रभान राऊत, नामदेव खोब्रागडे, एकनाथ अंबाडे, दादाजी धाकडे, नामदेव लाडे , केशव ढवळे इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी झाले.
   या यात्रेत श्री.रोहिदास राऊत व रिपब्लिकन पक्षाच्या इतर नेत्यांनी सभांना संबोधित केले. श्री.राऊत यांनी पक्षाच्या ऐतिहासिक वाटचालीबद्दल माहिती देऊन गौरवशाली इतिहास सांगीतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, मागासवर्गीय व वंचित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. रिपब्लिकन पक्ष हा सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा आवाज असून या पक्षाला बळकट करणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
   ही यात्रा गावोगावी पोहोचताच रिपब्लिकन पक्षाचा विजय असो, एकच नारा- रिपब्लिकन हमारा, रिपब्लिकन पार्टी झिंदाबाद आदी घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले आणि ग्रामस्थांनी यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यकर्त्यांनी गावांत फिरून घरोघरी, दुकानांना भेटी दिल्या आणि लोकांना पत्रके वाटून पक्षाची माहिती दिली.
   या यात्रेत हेमंत रामटेके, मदन बारसागडे, दिनाजी लोणेरे, उमाकांत बोरकर, नरहरी भानारकर, होनाजी टेंभुर्णे, धनंजय उंदिरवाडे, संतोष अंबाडे, दिलीप नंदेश्वर, कवडूजी अंबाडे, समाधान अंबाडे, काकाजी बोडेले, रघुनाथ अंबाडे, राजूनाथ अंबाडे, अरविंद अंबाडे, अरविंद अंबाडे आदी उपस्थित होते. , बंडू भैसारे , अरुण भैसारे , निळकंठ भैसारे , विजय उंदिरवाडे , योगराज नंदेश्वर , विनायक धाकडे , अंबादास खोब्रागडे, लोकेश लोणेरे, जनार्दन खोब्रागडे, सुरेश लोणारे, खेमाजी बारसागडे, भाष्कर लोणारे व शेकडो कार्यकर्ते तथा नागरिकांनी सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post