प्रेम प्रकरणात दोन तरुणावर चाकूने हल्ला, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी..

भंडारा ०४ एप्रिल ::- प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात दोन तरुणांवर धारदार चाकूने प्रहार करण्यात आला. यात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला. आवेज हसन शेख (२२) रा. ठाणा असे मृताचे नाव असून, श्रेयस मुन्ना वाहाणे (१८) असे गंभीर जखमीचे नाव आहे. ही थरारक घटना ठाणा येथील निहारवाणी रस्त्यावर सोमवारी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. घटनेनंतर पसार झालेल्या दोन्ही मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या घटनेने मात्र ठाणा येथे तणाव निर्माण झाला.
प्राप्त माहितीनुसार, आवेज शेख याला भंडारा येथील दोन्ही तरुणांनी फोन करून बोलावले. दरम्यान, आवेज व श्रेयस वाहने ठाणा निहारवाणी रस्त्यावर गेले होते. भंडारा येथून आलेल्या दोन्ही तरुणांनी वादातून आवेज व श्रेयसवर चाकूने वार केले. यात आवेजच्या मानेला, पोटाला व हाताला चाकूचा जबर वार लागला. यात आवेजच्या मृत्यू झाला, तर श्रेयस हा गंभीर जखमी झाला. यावेळी तेथे दोन तरुणी सुद्धा उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती आहे. पसार झालेल्या दोन्ही आरोपींनी भंडारा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात तन्वीर पठाण (२२) व अन्य एका साथीदाराचा समावेश आहे.
रक्तबंबाळ अवस्थेत श्रेयसने ठाणा येथील आपल्या मित्रांना घटनेची माहिती दिली. तीन ते चार मित्र घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी आवेज व श्रेयस रक्तबंबाळ अवस्थेत डांबरी रस्त्यावर पडलेले होते. दोघांनाही लगेच शहापूर आरोग्य उपकेंद्र येथे दुचाकीने आणले. मात्र, तोपर्यंत आवेजचा मृत्यू झाला. श्रेयसवर प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनास्थळी व शहापूर आरोग्यवर्धिनी केंद्र येथे अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, ठाणेदार सुधीर बोरकुटे दाखल झाले. शहापूर आरोग्यवर्धिनी केंद्रात लोकांची गर्दी जमली होती. दोन्ही बाजूंकडून पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post