पीरमेडा ता. सिरोंचा येथे महसूल विभागाकडून शासकीय योजनांची जत्रा (महाराजस्व अभियान )


👆👆👆👆👆👆👆
व्हिडियो जरूर बघा 

दिनांक 18-4-2022 रोजी मा मुख्यमंत्री शासकीय योजना गतीमान अंमलबजावणी अभियाना अंतर्गत तालुका प्रशासन सिरोंचा जि. गडचिरोली मार्फत शासकीय योजनांची जत्रा या घोषवाक्यानुसार महाराजस्व अभियान सिरोंचा तालुक्यातील पिरमेडा या अत्यंत डोंगराळ आदिवासी क्षेत्रामध्ये मा. श्री अंकित (भा.प्र.से.) सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अहेरी जि. गडचिरोली मा. श्री जितेंद्र शिकतोडे, तहसिलदार सिरोंचा श्री अनिलकुमार पटले संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती सिरोचा यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आलेली होती.








सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) माजी जिल्हापरिषद अध्यक्षा यांचे हस्ते मा. श्री जितेंन्द्र शिकतोडे तहसिलदार सिरोंचा यांचे अध्यक्षेतेखाली महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आदीवासी समाजाचे आद्य दैवत भगवान बिरसा मुंडा, स्त्री शिक्षणाच्या महामेरु सावित्रीबाई फुले, मिसाईल मॅन तथा भुतपुर्व राष्ट्रपती भारत सरकार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम तसेच विद्येची देवी माता सरस्वती यांचे फोटोंचे पुजन करुन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.








कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणुन श्री अनिलकुमार पटले, संवर्ग विकास अधिकारी पं. स. सिरोंचा, श्री जगदिश दोंदे तालुका कृषी अधिकारी सिरोंचा, श्री नरवडे, उपविभागीय अभियंता, म.रा. वि. वि. कंपणी सिरोंचा, श्री एम. एन. मांडवगडे, नायब तहसिलदार सिरोंचा श्री एस. एम. तोटावार, नायब तहसिलदार सिरोंचा श्री घोडे पशुधन विकास अधिकारी सिरोंचा श्री परपटला सत्यनारायण माजी सभापती पं.स. सिरोंचा तसेच बामणी मंडळातील सर्व सरपंच व उपसरपंच यांचे उपस्थितीत तसेच मौजा मोयाबीनपेठा, कोटापल्ली, बॉन्ड्रा, बोगटागुडम, दर्शेवाडा, पिरमेडा, झेंडा, विठठलरावपेठा माल, विठठलरावपेठा चेक, विठठलरावपेठा वे. लॅ. रेगुठा माल, रेगुठा चेक, नरसिहापल्ली, येल्ला, पर्सेवाडा, चिक्याला, रामन्नापेठा या डोंगराळ अतीदुर्गम भागातील आदिवासी शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत महाराजस्व अभियानाकरीता प्रामुख्याने उपस्थित होते.






उपरोक्त कार्यक्रमामध्ये तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभाग, निवडणुक विभाग, पुरवठा विभाग, तसेच नैसर्गीक आपत्ती विभाग तसेच तालुक्यातील पंचायत समिती, तालूका कृषी विभाग, वनविभाग भुमी अभिलेख विभाग, पशुधन विकास कार्यालय, ग्रामिण रुग्नालय, बँक ऑफ महाराष्ट् तालुका आरोग्य कार्यालय, महिला व बाल विकास, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग इत्यादी विभागांकडुन लाभार्थ्यांना त्यांचे दाखले त्यांचे गावामध्ये आयोजी कार्यक्रमात वितरीत करण्यात आले त्या मध्ये प्रामुख्याने तहसिल कार्यालयाकडुन नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन विभागकडुन सन 2022 मध्ये आलेल्या पुरामध्ये नाल्यात डुबुन मय्यत झालेले बक्कय्या तोडसाम याच्या पत्नी श्रीमती रामबाई बक्कय्या तोडसाम यांना रु.4 लक्ष इतक्यारक्कमेंच्या धनादेशाचे वितरण प्रमुख अतीथींचे हस्ते करण्यात येवुन, संजय गांधी विभागाकडुन राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी रु.20 हजार प्रमाणे ७ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. संजय गांधी /श्रावणबाळ योजनेअंतर्गत एकुण 40 लाभार्थ्यांना त्यांचे बँक खात्यामध्ये थेट लाभ देवुन त्याबाबत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र), उत्पन्नाचे दाखले, रहिवाशी दाखले, जॉब कार्ड, राशन कार्ड, निवडणुक ओळखपत्र, आधार कार्ड, नविन पि.एम. किसान नोदणी, वारस फेरफार, ई श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, वन हक्क दावे स्विकारणे असे एकुण 18,395 दाखल्यांचे वाटप उपस्थित प्रमुख पाहुण्याचे हस्ते व मा. तहसिलदार सिरोंचा यांचे हस्ते लार्भार्थाना वाटप करण्यात आलेले असुन पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत मानव विकास योजनेअंतर्गत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीना एकुण 46 सायकलींचे वाटप करण्यात आलेले असुन तर 83 विद्यार्थाना सुवर्णमहोत्सव शिष्यवृत्तीचा लाभ प्रदान करण्यात आला तर 200 बि.पी.एल. लाभार्थ्यांना दाखल्याचे वाटप करण्यात आले. वन विभागांकडुन 29 लाभार्थ्यांना गॅस व सिलेडर चे वाटप करण्यात आले, पशुवैद्यकीय अधिकारी विभागाकडुन 1000 पक्षी संगोपनाकरीता पोल्ट्री फार्म करीता श्री कमलेश चंद्र रामटेके यांना कार्यारंभ आदेशाचे वितरण करण्यात आलेले असुन महिला व बाल विकास विभागांकडुन एकुण 5 महिला बचतगटांना बचतगट नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.





उपरोक्त शिबीरामध्ये विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी सुध्दा पुर्ण सहभागाने उपस्थित राहुन त्यांचे विभागाकडुन राबविण्यात येणा-या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित सर्व गावक-यांना करुन दिलेली असुन सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्री प्रशांत धात्रक, मंडळ अधिकारी बामणी, श्री अरुण गेडाम, मंडळ अधिकारी सिरोंचा तसेच दिलीप पुंगाटी, तलाठी मोयाबीनपेठा, संजय सिडाम तलाठी विठठलरावपेठा श्री मल्लेश पोरतेट तलाठी नरसिहापल्ली व बामणी मंडळातील इतर सर्व तलाठी व सर्व कोतवाल तसेच तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतलेले असुन मौजे पिरमेडा येथील जि. प. शाळेतील तसेच भगवंतराव विद्यालय, पिरमेडा येथील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पिरमेडा येथील सर्व अधिकारी तसेच कर्मचा-यानी सुध्दा सहभाग नोंदवुन कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता सहकार्य केले.

व्हिडिओ बघा
👇👇👇👇👇👇👇



उपरोक्त कार्यक्रमामध्ये संचालन प्रियंका संग्रामे सहा. शिक्षीका मोयाबीनपेठा व श्री समीर शेख सहा. शिक्षक, दर्शेवाडा यांनी केलेले असुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाचे श्री अनिलकुमार पटले गट विकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचा यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप पूंगाटी, तलाठी मोयाबीनपेठा यांनी करुन कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले.

Post a Comment

Previous Post Next Post