आलापल्ली ते अहेरी रस्ता होणार गुळगुळीत



आ धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

अहेरी:-  सार्वजनिक बांधकाम विभाग,आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या आलापल्ली ते अहेरी रस्त्याचे काम सुरू होणार असून आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

मागील अनेक दिवसांपासून आलापल्ली ते अहेरी रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अहेरी हे तालुक्याचे ठिकाण असून मुख्य बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते.मात्र,रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ये-जा करणाऱ्यांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत होता.या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी अहेरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक भाऊ आईंचवार यांनी केली होती म्हणून अखेर निधी प्राप्त झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.सदर रस्त्याचे काम झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे हे विशेष.

आलापल्ली येथील सिरोंचा पुलापासून सदर काम होणार असून 29 मे रोजी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,सार्वजनीक बांधकाम विभाग,आलापल्लीचे कार्यकारी अभियंता बलवंत रामटेके तसेच संबंधित कंत्रादार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post